भ्रष्टाचार विरोधी मंच च्या जिल्हाध्यक्षपदी बिपिन दिड्डी यांची नियुक्ती.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक गरीब, पीडित, वंचित नागरिकांना मदत करणारे, शहरातील अनेक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता अनेक संस्थेच्या माध्यमातून काम करणारे बिपिन दिड्डी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या जिल्हा अध्यक्ष ( सामाजिक संरक्षण विभाग ) पदावर नियुक्ती करण्यात आली.
हा कार्यक्रम सोलापुरात पार पडला त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंच संघटनेच्या ओळखपत्र नियुक्तीपत्र देऊन बिपिन दिड्डी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आली त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश कार्याध्यक्ष मीर महमूद खान, प्रवीण चांदेकर, शहर अध्यक्ष ( माहिती अधिकार विभाग ) अमोल कुलकर्णी, अकबर शेख, पत्रकार श्रीनिवास वंगा उपस्थित होते.

0 Comments