------------------------------------------------
मुंबई विधानभवनात परिवहन मंत्री ने दिनांक दोन जुलै रोजी वाहतूक संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती वाहतुकीचे नियम करण्यासाठी नेमलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी / अंमलदार हे त्यांचे खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनाचे फोटो काढून ते सोयीनुसार,ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात बाबतचा मुद्या सदर बैठकीमध्ये वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांचेकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत मा. मंत्री, परिवहन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या कार्यालयाकडून ई चलानची कारवाई करताना स्वतःचे खाजगी मोबाईल फोनचा वापर न करणेबाबत उपरोक्त संदर्भ क्र. २ ते ४ चे पत्रान्वये यापुर्वीच आदेशीत करण्यात आले होते.परंतु असे निदर्शनास आले आहे की, अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ (real time) सोडून, ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटोचा वापर करून चुकीच्या पध्दतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करताना पोलीस अधिकारी / अंमलदार निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. असा परिपत्रक अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक 3 जुलै रोजी परिपत्रक काढला आहे या परिपत्रकची सोलापूर शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी मंच च्या माध्यमातून निवेदन देण्यात आला. त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक मुजावर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहसीन बागवान, शहराध्यक्ष माहिती ( अधिकार विभाग ) अमोल कुलकर्णी,जिल्हा प्रचार प्रमुख बंदेनवाज शेख, महबूब मुजावर उपस्थित होते.

0 Comments