Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नूतन पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

 नूतन पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार 



सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस खात्यामधील शांत संयमी मनमिळावू सदाबहार व्यक्तिमत्व असलेले त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणीचे निवारण कसे होईल यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे त्याचबरोबर सोलापूर शहरातील पत्रकारांबरोबर नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे शब्बीर तांबोळी यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर शहराध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद श्रीनिवास पेद्दी महेश मेटकरी मुबीन खान अमोल कुलकर्णी इमरान अत्तार मुजम्मिल काखंडकीकर निसार शेख व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments