सोलापुरात ऑनलाईन चक्रीगेमच्या गुन्ह्यात ग्रामीणच्या पोलिसांनी २३ आरोपींविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात केला दाखल.
फिर्यादी व साक्षीदारांची केली २ कोटी ७८ लाखांची फसवणूक.
सोलापूर / प्रतिनिधी
ऑनलाइन चक्रीगेमच्या अवैध व्यवसाय करणाऱ्या २३ आरोपीतांविरुध्द सोलापूर ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून न्यायालयात ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
अवैधरित्या चालणाऱ्या ऑनलाईन फनरेप (चक्री) गेमचे माध्यमातून फसवणूक झालेबाबत बालाजी विष्णु खारे (वय २७, रा. लऊळ, ता. माढा) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन नितीन महादु पाटमस, रणजित महादेव सुतार, वैभव बाबू सुतार (सर्व रा. कुडूवाडी ता. माढा जि. सोलापूर) यांचेविरुध्द १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषन करुन आरोपीतांचे बँक खात्याची सखोल पडताळणी करुन तपासाम ध्ये केंद्र व राज्य शासनाचे परवानगीशिवाय अवैध ऑनलाईन चक्रीगेम व्यवसाय करणारे कंपनीचे एजंट, डिस्ट्रीव्युटर्स, सुपर डिस्ट्रिब्युटर्स यांचेसह एकूण २३ आरोपी निष्पन्न केले. या सर्वांच्या बँक खात्यावर ३६ कोटी ३३ लाख ६७ हजार ६२८ रुपये इतक्या रक्कमेचा व्यवहार केलेचे निष्पन्न झाले असून यातील आरोपीतांनी गुन्हयांतील फिर्यादी व इतर ७ साक्षीदारासह आरोपीच्या बँक खाते उतारे पडताळणीवरुन २ कोटी ७८ लाख २६ हजार ७२६ रुपयांची फसवणूक केल्याची निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास पूर्ण करून सर्व २३ आरोपीतांविरुध्द ४,९८३ पानाचे दोषारोपपत्र माढा येथील प्रथमवर्ग न्यायालय दाखल करुन कुडूवाडी व बार्शी सह सोलापूर जिल्हयातील अवैध ऑनलाईन चक्री व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त केलेले आहे.
सदरची कामगिरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक दिपक चव्हाण यांचे नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड, पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे, हवालदार हनिफ शेख, नागेश वाघमोडे, माधव बोराडे, विनय यजगर, महिला पोलिस नाईक निता डोकडे, पोलिस शिपाई जयेश काळोखे, सायबर पोलीस ठाण्याचे हवालदार व्यंकटेश मोरे, स्वप्निल सन्नके तसेच कुडूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे व पोलिस शिपाईपटाईत यांनी केली.
%20(2).jpeg)
0 Comments