जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या दोघांना अटक.
या गुन्ह्यात महिलेचा समावेश; ७ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त.
टेंभूर्णी, दि. ३ जून-चार चाकी स्विफ्ट गाडीमध्ये महिला प्रवाशांना बसवून निर्जन ठिकाणी नेवून अंगावरील सोने, चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या विशाल उर्फ भैय्या बाळासाहेब शिंदे वय-२४ वर्षे रा. वाखरी ता. पंढरपूर २) सुषमा सागर कांबळे वय २५ वर्षे रा. मंगळवेढेकर नगर, पंढरपूर या दोघांचा टेंभुर्णी पोलिसांनी पर्दाफाश करून एका महिलेसह दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील चार विविध गुन्ह्याची कबुली देऊन त्यांचेकडून ७ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
दि. २२ मे रोजी श्रीमती शंकुतला शिवाजी देवकर वय ६५ वर्षे (रा. खांडवी ता. बार्शी) या मुलीला भेटण्यासाठी बार्शी येथून एस टी बसने टेंभुर्णी येथे आले होते तिथून पुढे फ टजवळगावला जाण्यासाठी पायी जात असताना बेंबळे चौकात आल्यानंतर संशयित आरोपी विशाल उर्फ भैय्या बाळासाहेब शिंदे व सुषमा सागर कांबळे हे दोघे जण स्विफ्ट कार म धून आले करमाळा चौकात जाणारा रस्ता विचारला व तुम्हालाही करमाळा चौकात सोडतो म्हणून गाडीमध्ये बसवले व गाडी अकलूज रोडवरील देवरे याठिकाणी घेऊन गेले व नंतर त्या वयोवृद्ध महिलेला इतरत्र फिरवून तिच्या डोळयात चटणी टाकून त्यांचे अंगावरील सोन्याचे गंठण, बोरमाळ, फुलेझुबे, बुगडया असे ३५ ग्रॅमचे दागिणे हाताने ओरबडून काढून तिला गंभीर जखमी करीत व ५०,०००/-रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा २,०९,५००/- रूपयेचा ऐवज बळजबरीने लुटून नेला होता. हा गुन्हा गंभीर असल्याने पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या गाडीचा नंबर शोधून आरोपींची खात्री करून त्यांच्याकडे चौकशी करून पोलीसही खाक्या दाखवतास त्यांनी त्यांनी टेंभुर्णी प्रमाणेच गादेगांव, वाडीकुरोली (ता. पंढरपूर व माळशिरस) या ठिकाणी ही चोरी केल्याचे कबुली दिली. यानंतर त्यांचेकडून सहा तोळे सोन्यासह ७ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक नारायण पवार यांनी कामगीरी केली. यामध्ये डि बी पथकाचे अधिकारी पोसई कुलदिप सोनटक्के, पो.ह. विलास नलवडे, संदिप गिरमकर, अक्षय कांबळे, अक्षय सरडे, मोहन तळेकर, महिला पोलिस शिंदे यांनी कामगीरी बजावली आहे.

0 Comments