३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपींना अटक, मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी.
मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये तीन वेगवेगळ्या घटनांचा तपास करून ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक : करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की मोहोळ पोलीस ठाण्या च्या हद्दीत ३० मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या : सुमारास मोहोळ वैराग रोडवर हॉटेलच्या जवळ थांबलेल्या शशिकांत दाईंगडे यास शिवीगाळ दमदाटी व मारहाण ! करून ऊसतोड कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने हातातील अंगठी काढून रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपी पळून गेले होते. या घटनेचा मोहोळ पोलिसांनी : कसून तपास करून या गुन्हातील सोमनाथ धोंडीराम मोरे, राज मनोज पवार व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक राहणार पंढरपूर अशा तिघांना पकडून त्यांच्याकडून : मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर हे करत होते. याच दिवशी रात्रीच्या वेळी शेटफळ चौकात : माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ यांचे कळपातील मेंढ्या चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करून आरोपी पर्यंत जाणे मुश्किल झालं होत. अशा परिस्थितीत मोहोळ पोलिसांनी शिताफिने तपास करून सुनील विजय भोसले (वय २१ रा. संगदरी ता. दक्षिण सोलापूर), दत्तात्रय गायकवाड (रा. दहिवडी ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव), लक्ष्मण राजकुमार काळे (२५ रा पाटकुल ता. मोहोळ) यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मेंढरेहस्तगत करण्यात आली आहेत. तिसऱ्या घटनेत बिटले (ता. ोहोळ) येथे यल्लमा देवीच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यात गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती घेऊन (पाथरूड ता. भूम जि. धाराशिव) येथील ननिता यासीन खान भोसले (वय ३० वर्ष) रा. नेवासा जि. अहिल्यानगर सध्या रा. पाथरूड ता. भूम जि. धाराशिव), सुनिता नानासाहेब पंडित (वय ३५ वर्ष) (रा. पाथरूड ता. भोर जिल्हा धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हिवाळी हे करीत आहेत. या घटनेच्या तपासणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या म मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, दयानंद हेंबाडे, संदेश पवार, चंद्रकांत ढवळे, मनीषा तरटे, अमोल जगताप, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, रोहन पवार, योगेश खराटे, सुनील पवार, अभिराज राठोड, तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण यांनी कामगिरी केली.

0 Comments