Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर जिल्हा परिषद चे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

 सोलापूर जिल्हा परिषद चे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा  


बेकायदेशीर नियुक्ती, अन्य तिघेजण आले अडचणीत

कोणतीही चौकशी न करता बेकायदेशीररित्या अनुकंपा नियुक्ती करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर (वय ५८) यांच्यासह शासनाची व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात १६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ जून २०२२ ते १६ जून २०२५ या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी स्वामीराव रावसाहेब पाटील (वय ८५, रा कुरनूर, ता. अक्कलकोट) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार महादेव केशव माने (वय ४०, रा. चुंगी, ता. अक्कलकोट), मधुमती महादेव माने (वय ३५), श्रीशैल शिवशंकर स्वामी (वय ३५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस ३ (५), ३१६ (२), ३१८ (१), ३३६ (१,३), ३३८, ख ३५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिक्षण संस्थेतील तिघांनी मिळून संगनमत करून खोटी कागदपत्रे बनविली. त्यानंतर विश्वस्त अध्यक्ष म्हणून खोटी सही करून, खोटे शिक्के मारून, खोटा ठराव तयार केला. यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून श्रीशैल स्वामी यांची बेकायदेशीररित्या (अनुकंपा) नियुक्ती केली. एवढेच नव्हे तर शासनाचे रक्कम पगार वगैरे घेऊन सर्व कागदपत्रे सरकार दप्तरी खरे आहे, असे भासविली.

याशिवाय शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी कोणतीही चौकशी न करता मंजुरी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शासनाची फसवणूक व आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

Post a Comment

0 Comments