Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

दुचाकीचे टायर फुटून तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी

 दुचाकीचे टायर फुटून तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी.

सोलापूर : दुर्लक्ष, वेग आणि असुरक्षित रस्त्यांची भयंकर किंमत पुन्हा एकदा एका तरुणाने जीव देऊन चुकवली आहे. कंदलगाव ते येळेगाव रस्त्यावर भरधाव वेगात निघालेल्या दुचाकीचे पाठीमागील टायर अचानक फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सुशील भीमराव सोनटक्के (वय ४०, रा. कंदलगाव, माळशिरस तालुका) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हैदर रजाक शेख (वय ४५) हा गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.या संदर्भात हैदर शेख यांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात ३ डिसेंबर २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी सुशील आणि हैदर हे एमएच १३ एडब्ल्यू ८३२० या क्रमांकाच्या दुचाकीवर कंदलगावकडून येळेगावकडे जात होते. कंदलगाव शिवारातील महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील दूध डेअरी समोर सुशील सोनटक्के भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना अचानक पाठीमागील टायर फुटला.टायर फुटल्याचा दणका एवढा जबरदस्त होता की दुचाकीवरील दोघे थेट रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला व अंगावर गंभीर मार लागल्याने सुशीलचा जागीच मृत्यू झाला. हैदर शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक तपासात अतिवेग आणि टायरची खराब अवस्था ही अपघाताची मुख्य कारणे असल्याचे नमूद केले आहे. आश्चर्य म्हणजे, अपघातग्रस्त असलेल्या सुशील सोनटक्के याच्याविरोधातच निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या अपघातातून पुन्हा एकदा स्पष्ट होते की रस्ते सुरक्षेतील निष्काळजीपणा आणि वाहनांच्या तांत्रिक तपासणीअभावी निरपराधांचे प्राण जातात; मात्र परिस्थिती बदलण्याची जबाबदारी कोणी स्वीकारणार?


Post a Comment

0 Comments