Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कामगिरी, गोवा राज्यातील मोठा विदेशी दारूसाठा आणि दोन वाहने जप्त.

 सोलापूर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कामगिरी, गोवा राज्यातील मोठा विदेशी दारूसाठा आणि दोन वाहने जप्त.


सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १ या कार्यालयाने 

दि, १० जून २०२५ रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित एकुण १४० बॉक्सेस व दोन चारचाकी वाहनासह एकुन रुपये ३१ लाख ,९० हजार रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास निरिक्षक श्री आर. एम. चवरे व दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे हे करीत आहेत.तसेच दि. ०१/०४/२०२५ व १०/०६/२०२५ या कलावधीत रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ५७० गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विभागाकडुन या कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील एकूण ३३ ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून ढाब्यावर कलम ६८ व ८४ अन्वये १३२ जणांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाई निरीक्षक सदरची कारवाई सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, व जवान सर्वश्री, नंदकुमार वेळापूरे, अण्णा कर्च, पवन उगले, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक दिपक वाघमारे यांनी पार पाडली

अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असे श्रीमती भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments