Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ओंकार ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगारांकडून ०१,७२,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने जप्त.

 ओंकार ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगारांकडून ०१,७२,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने जप्त. 


शहर गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक ०९/०६/२०२५ रोजी, सोलापुर शहरातील भवानी पेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडुन, आत प्रवेश करुन, दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिणे चोरुन नेलेबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरून, अज्ञात चोरटयाविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे, सोलापुर शहर येथे गुरनं. ३९९/२०२५, भा.न्या.सं.क.३३१ (३),३३१(४), ३०५(A) प्रमाणे दि.१०/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील स.पो.नि./विजय पाटील, पो.स.ई./मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना, खात्रीशिर बातमी मिळाली की, दोन इसम हे चोरीचे चांदी व सोन्याचे दागिणे घेऊन ०२ नंबर बस स्टैंड, शास्त्री नगर, सोलापुर येथे थांबले असल्याची बातमी मिळाली. प्राप्त बातमीची शहानिशा करून, कारवाई करणेकामी सदर ठिकाणी जावुन, आरोपी नामे-सिध्दनाथ ऊर्फ ढेप्या गंगाधर बंडगर, वय-२१ वर्ष, रा.मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापुर व एक विधिसंघर्षित बालक यांना, चोरी केलेले चांदीचे व सोन्याचे दागिण्यासह ताब्यात घेतले. त्यांनतर, त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने, अल्पवयीन बालकाचे नातेवाईक यांचेसमक्ष अधिक चौकशी केली असता, त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार, जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं. ३९९/२०२५, भा.न्या.सं.क.३३१ (३), ३३१ (४), ३०५ (A) अन्वये दाखल गुन्हयातील १२२० ग्रॅम चांदीचे वस्तु व ०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकुण ०१,७२,०००/- रुपये किमतीचे दागिणे जप्त केले आहेत.सदरची कामगिरी, मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./विजय पाटील, पोसई/मुकेश गायकवाड व पोलीस अंमलदार सफौ/नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विठठल यलमार, मपोह/शिलावती काळे, चालक-सतीश काटे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments