Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

डफरीन चौक येथील 'एटीएम' सेंटरमध्ये वृद्ध इसमाचा पासवर्ड पाहून व कार्ड बदलून ४० हजाराला गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल





 डफरीन चौक येथील 'एटीएम' सेंटरमध्ये वृद्ध इसमाचा पासवर्ड पाहून व कार्ड बदलून ४० हजाराला गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. राजाराम सीताराम ठाकूर (वय ६१, रा. युनिटी क्लासिक अपार्टमेंट रेल्वे लाइन, सोलापूर) हे एसबीआय बँकेच्या 'एटीएम' सेंटरमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने पैसे काढताना पीन टाकताना बघितले.राजाराम ठाकूर पैसे काढून ते मोजत असताना, अनोळखी इसमाने हातचलाखी करून, 'एटीएम' मशीनमधून कार्ड काढून घेऊन त्याच्या जवळील दुसरे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर काही वेळाने त्याने राजाराम यांच्या 'एटीएम' कार्डवरून ४० हजार रुपये काढून घेतले. तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments