इंस्टाग्राम वर स्टोरीच्या माध्यमातून चॅलेंज करणारे आरोपीला आठ दिवसांत पकडलं
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : २ पिस्टलसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्तमहामार्गावर रात्रीच्यावेळीगा ड्या अडवून लुटणाऱ्याला पोलिस आपल्या मागावर असल्याचे कळाल्यावर आरोपीने इस्टावर 'मला पकडून दाखवा' असे स्टेटस ठेवत पोलिसांना चॅलेंज केलं. हे चॅलेंज स्वीकारत पोलिसांनी चैतन्य ऊर्फ भैया पांडुरंग शेळके (वय २३, रा. भोत्रा, परांडा, धाराशिव), करण शिवाजी भोसले (वय २२, रा. खांडवी, बार्शी) व मारुती नागनाथ माने (रा. सुटका, भूम, धाराशिव) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ वाहने असा एकूण १२ लाखांचे मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि नागनाथ खुणे यांच्या टीमने हस्तगत केला.आरोपीच्या शोधात असताना सपोनि नागनाथ खुणे यांच्या पथकातील कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील व अक्षय डोंगरे यांना आरोपींविषयी गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच आरोपी चैतन्य शेळके, करण भोसले यांना बार्शी रोडवरील कारंबा येथे पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व चोरीतील कार मिळाली. त्यांनी कुडूवाडी ते बार्शी रोडवर कारचालकाला पिस्टलचा धाक दाखवून लुटले. यात सोन्याचे लॉकेटही त्यांनी काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. यात आरोपींना मारुती माने याने त्यांना पिस्टल विकले होते. दरम्यान, आरोपींकडून बार्शी शहरातील एक तालुक्यातील एक, करमाळा, कामती, कुईवाडी, वैराग, तुळजापूर पोलिस ठाणे येथील प्रत्येकी एक असे एकूण ४ जबरी चोरीचे व ३ वाहन चोरी व १ आर्म अॅक्ट असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरेपाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, समीर शेख, दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्निल कुबेर यांनी केली
इन्स्टावरच करत होते फोन
आरोपी हे फोन करण्यासाठी सिमकार्डचा वापर न करता इन्स्टाच्या माध्यमातून फोन करत होते. यासाठी पोलिसांनीही आरोपी हे कोणत्या इंटरनेट ऑपरेटरकडून डेटा वापरतात याची माहिती घेऊन आरोपींचा शोध घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

0 Comments