सोलापुर शहरातून तीन दुचाकींची चोरी
शहराच्या विविध भागातून चोरट्याने तीन दुचाकींची चोरी केली. आकाश सुरेश चौधरी (वय १८, रा. सिध्दार्थ नगर, शुक्रवार पेठ, सोलापूर) याने त्याची एमएच २५ बीबी ९८४३ ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २० एप्रिल रोजी सायंकाळी हॅन्डल लॉक करून पार्क केली होती. ती चोरट्याने चोरून नेल्याची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत अरविंद उपेंद्र चिलवेरी (वय २०, रा. निलम नगर, एमआयडीसी, सोलापूर) याने त्याची एमएच १३ एडब्ल्यू २६३३ ही २२ एप्रिल रोजी सकाळी दयानंद कॉलेजच्या मेनगेटजवळ हॅन्डल लॉक करून पार्क केली होती. ती चोरट्याने चोरून नेल्याची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोगशेट्टी पुढील तपास करीत आहेत. तिसऱ्या घटनेत अशपाक उस्मानगनी शेख (वय ४२, रा. न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी त्यांची एमएच १३ डीके ५०६८ क्रमांकाची दुचाकी ही रेल्वे स्टेशन पंप हाऊसजवळ ५ मे रोजी सायंकाळी हॅन्डल लॉक करून पार्क केली होती. ती चोरट्याने चोरून नेल्याची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार सरतापे पुढील तपास करीत आहेत.
.jpeg)
0 Comments