Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

डॉ.आकेन, यांच्यावर तात्काळ कारवाई करा सादिक शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल.

 डॉ.आकेन, यांच्यावर तात्काळ कारवाई करा सादिक शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल.

सोलापूर शहरातील विनायक नगर येथे सिद्धरामेश्वर नगर परिसरात डॉ.आकेन हे गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत डॉक्टरचा व्यवसाय चालवीत आहे, डॉ.आकेन यांच्याकडे कोणता ही वैद्यकीय प्रमाणपत्र व वैद्यकीय व्यवसाय करण्याचा प्रमाणपत्र नसताना हे डॉक्टर आपल्या व्यवसाय त्या ठिकाणी सुरू ठेवला आहे अनेक रुग्णांना उपचारासाठी वेगवेगळ्या मेडिसिन इंजेक्शन सलाईन लावून लाखो रुपयांची लूट सध्या हा डॉक्टर करत आहे.डॉ.आकेन मद्यपान (दारू) चा व्यसन देखील हा डॉक्टरला आहे बारा पंधरा दिवसांपूर्वी ह्या डॉक्टरांनी मद्यधुंद अवस्थेत ( दारू पिऊन ) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतदारूच्या नशेत एका व्यक्तीचा अपघात करून उलट पोलिसांना दमदाटीची भाषा केली होती त्यानंतर डॉक्टरला एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये हजर केले असता त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून संबंधित दारुड्या डॉक्टर वर कुठली कारवाई करण्यात आली नाही अशा दारुड्या डॉक्टर कडून जनसामान्य नागरिकांच्या जीवितास खूप मोठा नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, या दारुड्या बोगस डॉक्टर वर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करून कायमस्वरूपी त्याचा दवाखाना बंद करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंच चे संस्थापक अध्यक्ष  सादिक शेख यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments